महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रिपाई सोबत असताना भाजपने मनसेशी युती करू नये - रामदास आठवले

आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भक्कम साथ आहे. रिपाई सोबत असताना भाजपने राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नव निर्माण सेनेशी युती करू नये, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला दिला.

alliance with mns Ramdas Athawale reaction
भाजप सल्ला रामदास आठवले

By

Published : Oct 19, 2021, 9:17 PM IST

पुणे - आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भक्कम साथ आहे. रिपाई सोबत असताना भाजपने राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नव निर्माण सेनेशी युती करू नये. राज ठाकरे हे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने भाजपला त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे, भाजपने मनसेसोबत जाणे योग्य होणार नाही, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला दिला.

प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले

हेही वाचा -भारताने टी-20 मध्ये पाकिस्तानबरोबर सामना खेळू नये - रामदास आठवले

पुण्यात आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष संजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

जातनिहाय जनगणना व्हायला हवी

जनधन उज्जवला आणि मुद्रा योजनाअंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा झाला आहे. आवास योजनेत अनेकांना पक्की घरे मिळाली आहेत. आयुष्यमान भारत योजनेत सव्वा दोन लाखांच्या वर लोकांना लाभ झाला आहे. जात धर्म न पाहता नरेंद्र मोदी यांनी या योजना सर्वां पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जातनिहाय जनगणना व्हायला हवी अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही. तर, ज्या जाती अधिक मागास आहेत त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे सोयीचे होणार आहे. दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे, असे आठवले म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना अजूनही वाटत नाही की मी मुख्यमंत्री आहे

देवेंद्र फडणवीस यांना अजूनही मुख्यमंत्री असल्याचा भास होतो. यावर त्यांना तसा भास होतो तर दोन वर्षानंतरही उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही मुख्यमंत्री नाहीत, असे वाटते, अशी मिश्किल टिपण्णी आठवले यांनी केली. भाजप मनसेच्या नादाला लागल्यास रिपाई भाजपचा नाद सोडेल का? असे विचारल्यावर आम्ही त्यांचा नाद सोडला तरी ते आमचा नाद सोडणार नाहीत, असे आठवले म्हणाले.

स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायची की भाजपच्या अजून ठरलेले नाही. मात्र, आम्ही एकत्र निवडणूक लढवणार असून मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आणि मुंबईचे उपमहापौर रिपाईला मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा देखील करण्यात येणार आहे, असे आठवले म्हणाले.

हेही वाचा -मेफेरटाईन सल्फेट इंजेक्शन'ची बेकायदा विक्री करणाऱ्यांना अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details