पुणे : सध्या देशभरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वखाली भारत जोडो यात्रा सुरू असून या यात्रेला उस्पुर्त प्रतिसाद मिळत (Rahul Gandhi on Bharat Jodo Yatra) आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्रीरामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, यामुळे काँग्रेसला अच्छे दिन आले असं नाही. त्यांची ही यात्रा भारत जोडो यात्रा नव्हे तर भारत तोडो यात्रा आहे. आम्ही भारत जोडण्याचा प्रयत्न करत आहोत, राहुल गांधी हे भारत तोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी भारत जोडण्यापेक्षा आपला पक्ष जोडला पाहिजे, अशी टीका यावेळी आठवले यांनी (Ramdas Athawale criticizes on Bharat Jodo Yatra) केली.
महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी 1852 ला देशात पहिली शाळा सुरू केली. त्याला 170 वर्ष पूर्ण झाल्याने सावित्रीबाई फुले ग्रंथालय व ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते आणि डी.सी.एम संस्थेचे माजी अध्यक्ष एम.डी.शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते .
परवा पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावण्यात आल्याचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले म्हणाले की, जर पाकिस्तान झिंदाबाद चे नारे दिले असेल तर हे चुकीचे आहे. या देशात राहणारा प्रत्यके व्यक्ती हा पाकिस्तान झिंदाबादच्या विरोधात आवाज उठवणार व्यक्ती आहे. अशा घोषणा देण्यात आल्या होत्या की नाही, याची चौकशी व्हायला पाहिजे.
इतिहास घडवण्याची वेळ -नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन दिवसीय बारामती दौरा केला. बारामतीत भाजपचा खासदार जिंकून आल पाहिजे अशी एनडीएची इच्छा आहे. आम्ही चांगल काम केलं तर आम्ही निवडून येऊ शकतो. बारामतीची जागा पवार यांची आहे. त्यांनी तिथं चांगल काम केलं आहे. पण यावेळेस इतिहास घडवण्याची वेळ आहे. यंदा 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा आमचं निर्धार आहे. असं देखील यावेळी आठवले (Ramdas Athawale criticizes on Bharat Jodo Yatra) म्हणाले.