पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी ( Ramdas Athawale on Raj Thackeray mosque comment ) केलेल्या विधानानंतर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आठवले म्हणाले की, मशिदीवर परंपरागत भोंगे लावले आहे म्हणून आम्ही देखील भोंगे लावू ही भूमिका योग्य नाही. विरोधाला विरोध करणे हे योग्य नाही. राज ठाकरे ( Ramdas Athawale comment on Raj Thackeray ) हे एका पक्षाचे नेते आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ते वारसदार नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहे. पण, उद्धव ठाकरे हे त्यांचे वारसदार असूनही ते आमच्या सोबत येत नाही याचे दुःख आहे, असा टोला आठवले यांनी लगावला.
हेही वाचा -IPL 2022 RCB vs MI : विराट आणि रोहित शर्माला भेटणं चाहत्याला पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची महामुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसबरोबर जाऊ दिले नसते. पण, अजूनही वेळ गेलेली नाही. अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर अजूनही विचार करायला हवा. महाराष्ट्राच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विचार बदलावे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सोडावे आणि भाजपबरोबर एकत्र यावे, असे देखील यावेळी आठवले म्हणाले.