पुणे -यूएईमध्ये सुरू झालेल्या टी-20 विश्वकरंडकात भारत-पाकिस्तानमध्ये 24 ऑक्टोबरला क्रिकेट सामना रंगणार आहे. हा सामना रद्द करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांची पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन आले होते. यावेळी ते बोलत होते.
भारत-पाकिस्तान सामन्याची क्रिकेटचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तानमधील सामना रद्द करावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. याबाबत मी स्वतः जयेश शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.
भारताने टी-20 मध्ये पाकिस्तानबरोबर सामना खेळू नये हेही वाचा-सत्ता गेल्यानंतर काहींना भ्रमिष्टपणा येतो तर काहींचा तोल जातो, जयंत पाटलांचा चद्रकांत पाटलांना टोला पाकिस्तानला एकदा धडा शिकवला पाहिजे
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले, की काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित त्याचबरोबर मजुरांवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून हल्ले सुरू आहेत. हा पाकिस्तानचा खूप मोठा डाव आहे. आज काश्मीरमध्ये मजुरांना टार्गेट केले जात आहे. सरकार त्यांच्या या दबावाला घाबरणार नाही. आत्ता वेळ आली आहे की, त्यांना त्याची जागा दाखवली पाहिजे. पाकिस्तानला एकदाचा धडा शिकवलाच पाहिजे. पाकिस्तानच्या ताब्यात जे पाकव्याप्त काश्मीर आहे ते त्यांनी परत करावे. कारण काश्मीर हा भारताचा भूभाग आहे. त्यांच्याशी एकदा युद्ध हे झालेच पाहिजे, असेदेखील यावेळी आठवले यांनी सांगितले.
हेही वाचा-मुलांनी पार्टीत थोडीफार दारू घेतली तर काय झालं? महिला आमदार संतापल्या; व्हिडिओ व्हायरल
नुकतेच रामदास आठवलेंनी बंदवरून महाविकास आघाडीवर केली टीका
नुकतेच आठवले म्हणाले, की महाविकास आघाडी विरोधकांना विरोध करण्याच्या राजकारणात इतके मश्गुल आहे की त्यांना भान राहिलेले नाही, के ते राज्यात सरकार चालवीत आहेत. राज्य सरकार स्वतःच राज्यात बंद कसा पुकारू शकतात? सरकारने बंद पुकारने ही महाविकास आघाडीची चुकीची भूमिका आहे. त्यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती.