पुणे - भारत हा अल्पसंख्यांक देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्मांना सर्व हक्क आणि समान न्याय यावर भाष्य केलेले आहे. तर, मग मशिदीवर जे भोंगे आहेत, त्याला विरोध का?, असा सवाल केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यापुढे मशिदीवरचे भोंगे न उतरवता मंदिरावर भोंगे लावा. मात्र, मशिदीवरचे भोंगे उतरवले जाणार नाहीत. राज ठाकरेंनी भगव्याचे राजकारण करू नये, अशी टीकाही आठवलेंनी केली ( Ramdas Athavale On Loudspeaker Controversy ) आहे.
रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे हे फक्त धर्माचे राजकारण करत आहेत. पण, मशिदीवरील भोंगे कुठल्याही परिस्थितीत खाली उतरवले जाणार नाही. जर तीन तारखेला राज ठाकरेंनी अशी भूमिका घेतली. तर, रिपाईचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक मशिदीच्या बाहेर उभे राहून त्या भोंग्यांचे रक्षण करतील.