पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्ष सर्वच सण उत्सव हे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना निर्बंध शिथिल झाले आहेत. तब्बल 2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त रमजान साजरा होणार आहे. पण यंदाही नागरिकांना महागाईचा फटका बसला आहे. रमजानमध्ये महत्त्वाच समजल्या जाणाऱ्या खजुरांच्या किंमतीत 5 ते 10 टक्के वाढ झाली आहे.
मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान महिन्याला येत्या 3 एप्रिलला ( holy month of Ramadan ) सुरवात होणार आहे. रमजान निमित्ताने शहरातील विविध बाजारपेठा सजू लागल्या ( market on the occasion of Ramadan ) आहेत. उपवास सोडण्यासाठी पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मार्केटयार्डमध्ये 50 ते 60 प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध आहेत. त्यात सर्वाधिक मदिना येथून आलेल्या खजुराला विशेष पसंती दिली ( dates from Medina in India ) जात आहे.
हेही वाचा-Shiv Bhojan Thali : शौचालयात धुतल्या जातात शिवभोजनामधील थाळ्या; यवतमाळमधील व्हिडिओ व्हायरल
खजूरच्या किंमतीत 5 ते 10 टक्के वाढ
रमजान जवळ आल्याने बाजारपेठांमध्ये खजूर खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. पण उन्हाळा असल्याने बाजारात ग्राहकांचा कमी प्रतिसाद आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खजूरच्या किंमतीत 5 ते 10 टक्के वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. वाढत्या पेट्रोल व डिझेल वाढीचा फटका खजुरांच्या किंमतीवर झाला आहे. मागील वर्षी 100 ते 150 रुपये किलो असलेल्या खजुराची किंमत आज 200 रुपयांच्या आसपास पोहचली आहे.