महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 28, 2021, 5:04 PM IST

ETV Bharat / city

भेसळयुक्त नमुने आढळून आल्यास उत्पादकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करा - डॉ. राजेंद्र शिंगणे

सणासुदीच्या कालावधीत अन्नपदार्थ, मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, सौंदर्यप्रसाधने आदींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी काही समाजकंटक भेसळीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करुन नफा कमावण्याचा प्रयत्न करतात. त्याला विभागाच्या अधिकाऱ्यांनी आळा घालावा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.

डॉ राजेंद्र शिंगणे
डॉ राजेंद्र शिंगणे

पुणे -दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच अन्य खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्न भेसळीची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन अन्न प्रशासन विभागाने भेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी दक्ष राहावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. भेसळयुक्त नमुने आढळून आल्यास उत्पादकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई त्वरीत करावी, असे आदेशही त्यांनी बैठकीत दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

सणासुदीच्या कालावधीत अन्नपदार्थ, मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, सौंदर्यप्रसाधने आदींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी काही समाजकंटक भेसळीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करुन नफा कमावण्याचा प्रयत्न करतात. त्याला विभागाच्या अधिकाऱ्यांनी आळा घालावा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. ही उत्पादने तयार होण्याच्या ठिकाणी अचानक छापे टाकून तपासणीसाठी नमुने घ्यावेत. भेसळयुक्त नमुने आढळून आल्यास अशा उत्पादकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई त्वरीत करावी, असे यावेळी डॉ. शिंगणे पुढे म्हणाले.

हेही वाचा-डॉक्टर असल्याचे सांगून महिलेवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरलची धमकी दिल्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून अटक

अन्नभेसळीचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा-

गुळ उत्पादकांबाबत तक्रारी नुकत्याच आल्या आहेत. त्यानुसार काही उत्पादकांवर कारवाई करण्यात आली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुळ उत्पादक तसेच अन्य खाद्यपदार्थ उत्पादकांबरोबर बैठक घेऊन उत्पादनांचा दर्जा राखण्याचे महत्त्व तसेच कायद्यातील तरतुदींची माहिती त्यांना द्यावी. अन्नभेसळीचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असेही ते म्हणाले.

हेही वाचा-झेड प्लस सुरक्षा पुरवली म्हणजे चौकशी होणार नाही असे नाही - संजय राऊत

एनपीपीएच्या तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी जनजागृती अभियान राबवावे

राष्ट्रीय औषध किंमत नियामक प्राधिकरणाने (एनपीपीए) औषधांच्या किंमतीबाबत जनजागृतीसाठी मोहिम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. निश्चित केल्यापेक्षा जास्त किंमती असल्यास उत्पादकांविरुद्ध कारवाई करावी. एनपीपीएच्या तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी जनजागृती अभियान राबवावे, अशी सूचनाही डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा-मुंबई पोलीस करणार समीर वानखेडेंची चौकशी; चार तपास अधिकाऱ्यांचे नावे जाहीर

शासकीय विश्रामगृहातील बैठकीला अन्न प्रशासनचे सहआयुक्त शिवाजी देसाई, औषध प्रशासनचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details