महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उणिवा काय राहिल्या हे तपासून पुढील भूमिका घेऊ - मराठा क्रांती मोर्चा - मराठा आरक्षण रद्द

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जात असल्याने आणि 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यासाठी जी असाधारण परिस्थिती असते, ती अमान्य केल्याने हे आरक्षण रद्द झाल्याचे प्राथमिक स्तरावर दिसत असल्याचे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केले आहे.

मराठा क्रांती मोर्चा
मराठा क्रांती मोर्चा

By

Published : May 5, 2021, 3:47 PM IST

पुणे -सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जात असल्याने आणि 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यासाठी जी असाधारण परिस्थिती असते, ती अमान्य केल्याने हे आरक्षण रद्द झाल्याचे प्राथमिक स्तरावर दिसत असल्याचे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केले आहे. आता संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर त्याचा अभ्यास करू, राज्य सरकार कुठे कमी पडले आहे हे बघू तसेच न्यायालयाने नेमक्या काय उणिवा काढल्या हे तपासून पुढील भूमिका जाहीर करू, असे कोंढरे यांनी सांगितले आहे.

'उणिवा काय राहिल्या हे तपासून पुढील भूमिका घेऊ'

ABOUT THE AUTHOR

...view details