पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेनंतर 1 एप्रिलला राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होणार ( Raj Thackeray Aurangabad Rally ) आहे. या सभेसाठी राज ठाकरे हे आज 4 वाजता पुण्यात येणार आहेत. आणि उद्या सकाळी 8 वाजता पुण्यातून औरंगाबाद येथे जाणार आहेत. त्यांच्यासोबत 100 ते 150 गाड्यांचा ताफा जाणार आहे. यावेळी पुण्यावरून औरंगाबादेत जाण्यापूर्वी राज ठाकरे हे संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहेत, ( Raj Thackeray will visit Samadhi of Sambhaji Raje ) अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे.
१०० गाड्या राज ठाकरे यांच्या बरोबर निघणार -राज ठाकरे उद्या सकाळी 8 वाजता पुण्यातून निघणार आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या समाधीस्थळी राज ठाकरे उद्या भेट देणार आणि दर्शन घेणार आहे. सभेच्या आधी कुठला ही कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही. पुण्यातून १०० गाड्या राज ठाकरे यांच्या बरोबर निघणार आहेत. इतर 10 ते 12 हजार कार्यकर्ते सभेच्या दिवशी पुण्यातून सकाळी निघणार आहेत, असे देखील यावेळी वागस्कर यांनी सांगितले.