महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात राज ठाकरेंच्या सभेआधी पावसाची बॅटींग.. मैदान चिखलमय - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

कोथरुड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुप्रतिक्षित सभा शुक्रवार पेठेतील सरस्वती विद्या प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. परंतु, रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी पाणी साचले आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी पाणी साचले आहे.

By

Published : Oct 9, 2019, 12:41 PM IST

Updated : Oct 9, 2019, 1:14 PM IST

पुणे - कोथरुड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुप्रतिक्षित सभा शुक्रवार पेठेतील सरस्वती विद्या प्रशालेच्या मैदानावर होणार आहे.

पुण्यात राज ठाकरेंच्या सभेआधी पावसाची बॅटींग.. मैदान चिखलमय

परंतु, रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे या मैदानावर पाणी साचले असून या सभेवर पावसाचे सावट आहे. मैदानावर पाणी साचले असून,सध्या पंपाने हे पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी लाकडाचा भुसा टाकून चिखल झाकण्याचा प्रयत्न चालू आहे.मैदानावर भुसा, फ्लेक्स आणि खुर्च्या टाकून सभा घेणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याच्या सभेला शहरात जागाच मिळत नव्हती. अखेर शुक्रवार पेठेतील सरस्वती मंदिर संस्थेचे मैदान उपलब्ध झाले.

हेही वाचा कोथरुडमध्ये मनसे उमेदवारांमागे सर्व विरोधकांची ताकद ; पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न

आज सायंकाळी 6 वा. राज यांची तोफ धडाडणार असून, मनसेच्या प्रचाराचा नारळ यावेळी फुटणार आहे. 'ईडी'च्या चौकशीनंतर राज ठाकरे शांत होते.परंतु, आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Oct 9, 2019, 1:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details