पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वरती असलेले प्रेम हे आपण नेहमीच पाहिलेला आहे. कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या प्रतीचे प्रेम वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करत असतात. अशाच एका मनसे सैनिकाने आज राज ठाकरे यांच्याकडे आपल्या चार महिन्याचा मुलाचे नामकरण करण्याचा आग्रह धरला आणि या आग्रहाला प्रतिसाद देत राज ठाकरे यांनी देखील या मुलाचे यश असं नामकरण ( Raj Thackeray names the child ) केले.
राज यांनी चिमुरड्याला 'यश' हे नाव दिले -
परभणीचे निशांत आणि विशाखा कमळू हे दाम्पत्य त्यांच्या चार महिन्याच्या चिमुरड्याचे नाव राज यांच्याकडूनच ठेवण्यासाठी थेट राज ठाकरे बैठक घेत असलेल्या केसरी वाड्यात पोहोचले. बैठक संपल्यावर या दाम्पत्याने राज यांना गाठून चिमुरड्याला नाव देण्याची विनंती केली. मुलाच्या आईचा आग्रह पाहता राज यांनी चिमुरड्याला 'यश' हे नाव दिलं.