पुणे -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल शंभरहून ( Raj Thackeray left Pune for Aurangabad ) अधिक गाड्यांचा ताफा घेऊन पुण्याहून औरंगाबादच्या ( Raj Thackeray Aurangabad Rally News ) दिशेने निघाले आहेत. तब्बल 100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद ( Raj Thackeray Blessings from Priest pune ) घेतल्यानंतर पुणे शहरातून ( Raj Thackeray Aurangabad pune News ) राज ठाकरे हे औरंगाबादच्या दिशेने निघाले.
पुरोहितांकडून आशीर्वाद घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुरोहितांसोबत बोलताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -MPSC Result News : एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम
राज ठाकरे यांच्या घराबाहेर शंभरहून अधिक पुरोहितांनी विश्वाच्या कल्याणासाठी शांतीसुप्त पाठ हे सामूहिक मंत्र पठण केले. पुरोहितांनी राज ठाकरे यांना आशीर्वाद देखील दिला. राज ठाकरे हे पुण्याहून निघाले असून ते वडू तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार आहेत. तसेच, रस्त्यात अनेक मनसे पदाधिकार्यांच्या हस्ते राज ठाकरे यांचे स्वागत देखील होणार आहे.
काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष -गुडीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी येत्या 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंग्यांच्या बाबतीत अल्टिमेटम दिला आहे. उद्या (1 मे) औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला सशर्त परवानगी देण्यात आली असली तरी राज्यभरातून मोठ्या संख्येने मनसैनिक हजर राहणार आहेत. उद्या औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसंत मोरे गैरहजर -आज सकाळपासूनच राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर मोठ्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी जमले होते. मात्र, राज ठाकरे यांच्या पुण्यातील प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावणारे आणि पुढाकार घेणारे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे गैरहजर होते. त्यामुळे मोरे यांनी मनसे सोडली की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.
हेही वाचा -Raj Thackeray In Pune : राज ठाकरे पुण्यात दाखल, उद्या सकाळी होणार औरंगाबादकडे रवाना; 'असा' असेल दौरा