पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ( Raj Thackeray Aurangabad Rally ) महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांचा पुणे दौरा ( Raj Thackeray Pune Visit ) असून ते पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील त्यांच्या लॉ कॉलेज रोड येथील राजमहाल या त्यांच्या निवासस्थानी दुपारी ३.३० च्या सुमारास राज ठाकरे यांचं ( Raj Thackeray In Pune ) आगमन झालं आहे. आज राज ठाकरे हे पुण्यातच मुक्कामी असणार आहेत. उद्या सकाळी ८ च्या सुमारास ते हे पुण्यातून निघणार आहेत आणि ते बाय रोड औरंगाबादला जाणार आहेत.
Raj Thackeray In Pune : राज ठाकरे पुण्यात दाखल, उद्या सकाळी होणार औरंगाबादकडे रवाना; 'असा' असेल दौरा - राज ठाकरे ताज्या बातम्या
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ( Raj Thackeray Aurangabad Rally ) महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांचा पुणे दौरा ( Raj Thackeray Pune Visit ) असून ते पुण्यात दाखल झाले आहेत. उद्या सकाळी राज ठाकरे हे पुण्यातून औरंगाबादसाठी रवाना होतील.
असा असणार राज ठाकरे यांचा पूर्ण दौरा -उद्या सकाळी राज ठाकरे हे पुण्यातून औरंगाबादसाठी रवाना होतील. तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी जवळपास १०० ते २०० धार्मिक गुरूजी आणि पुरोहित उपस्थित असणार आहेत. हा छोटासा शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम झाल्यानंतर राज ठाकरे हे ९ च्या सुमारास ते औरंगाबाद कडे रवाना होणार आहेत. तसेच इथून निघाल्या नंतर राज ठाकरे हे वडू तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच दर्शन घेणार आहेत. तसेच रस्त्यात अनेक मनसे पदाधिकार्यांच्या हस्ते राज ठाकरे यांचं स्वागत देखील करणार आहेत.