पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( Maharashtra Navnirman Sena ) स्थापनेनंतर मराठी भाषेचा तसेच भूमिपुत्रांचा विषय हाती घेणाऱ्या राज ठाकरेंचा प्रवास आता आक्रमक हिंदुत्त्वाच्या ( MNS Hindu Politics ) दिशेनं सुरू झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने ( Pune Hanuman Jayanti Mahaaarti ) राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या हस्ते सामूहिक हनुमान चालीसा आणि महाआरती होणार आहे. या कार्यक्रमासाठी जे पोस्टर छापण्यात आले आहे. त्याचीच चर्चा सध्या राज्यभर सुरु आहे. पोस्टरवर राज ठाकरे यांना 'हिंदूजननायक' अशी उपाधी दिल्याने सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Pune Hanuman Jayanti Maha Aarti : पुण्यात महाआरतीच्या बॅनरवर राज ठाकरेंचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख - पुणे हनुमान जयंती महाआरती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( Maharashtra Navnirman Sena ) स्थापनेनंतर मराठी भाषेचा तसेच भूमिपुत्रांचा विषय हाती घेणाऱ्या राज ठाकरेंचा प्रवास आता आक्रमक हिंदुत्त्वाच्या ( MNS Hindu Politics ) दिशेनं सुरू झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने ( Pune Hanuman Jayanti Mahaaarti ) राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या हस्ते सामूहिक हनुमान चालीसा आणि महाआरती होणार आहे.
'हिंदुजननायक'चे पोस्टर -पुण्यातल्या खालकर मारुती चौकात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होईल. या कार्यक्रमाचे पोस्टर मनसेकडून तयार करण्यात आलं आहे. त्यावर राज यांचा उल्लेख 'हिंदुजननायक' असा करण्यात आला आहे. राज यांच्या नावापुढे लावण्यात आलेली ही उपाधी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची भूमिका घेतल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी 'हिंदुह्रदयसम्राट' अशी उपाधी राज ठाकरे यांना दिली होती. त्यानंतर मनसे यावर स्पष्टीकरण देत राज ठाकरे यांच्या नावापुढे कोणीही 'हिंदुह्रदयसम्राट' ही उपाधी लावू नये, असे म्हटले होते. मात्र, आता महाआरतीच्या पोस्टरवर 'हिंदुजननायक' ही उपाधी लावल्यानंतर मनसे काय भूमिका घेते, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.