महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raghunath Kuchik Case : पीडितेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; प्रकरणात लक्ष घालण्याची केली मागणी - पुण्यातील तरुणीचे मुख्यमंत्र्यांना लेटर

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणात ( Raghunath Kuchik Case ) पीडित तरुणीने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना पत्र लिहिले ( Raghunath Kuchik case victim letter to CM) आहे. 'या प्रकरणात लक्ष घालावे तसेच कुचिक यांना कुठल्याही पदावर ठेवू नये' असे तरुणीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Raghunath Kuchik Case
पीडितेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

By

Published : Apr 20, 2022, 7:36 PM IST

पुणे - शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणात ( Raghunath Kuchik Case ) पीडित तरुणीने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना पत्र लिहिले ( Raghunath Kuchik case victim letter to CM) आहे. 'या प्रकरणात लक्ष घालावे तसेच कुचिक यांना कुठल्याही पदावर ठेवू नये' असे तरुणीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पीडितेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्याचित्रा वाघ यांच्यावरआरोप - शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्याऱ्या पीडित तरुणीने काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. चित्रा वाघ यांनी आपल्याला सुसाईड नोट लिहायला लावल्याचा धक्कादायक आरोप या पीडित मुलीने केला आहे. तसेच कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांच्याच माणसांनीच आपले अपहरण करुन गोव्याला नेल्याचाही आरोपही या तरुणीने केले आहे.

'मुख्यमंत्र्यांनी मला मदत करावी' -बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी शिवसेना नेता रघुनाथ कुचिक याच्या कडून पीडित तरुणीवर दबाब आणला जात असल्याचे देखील यावेळी पीडित तरुणीने म्हटले आहे. गुन्हा मागे न घेतल्यास शरीर संबंधांचे व्हिडिओ व्हायलर करण्याची धमकी देखील देण्यात येत आहे. कुचिक याने काही व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. याप्रकरणात मला मदत मिळावी म्हणून मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे, असे देखील यावेळी पीडित तरुणीने म्हटले आहे.

हेही वाचा -Raghunath Kuchik case : पोलिसांना दिलेली तक्रार मागे घेणार - पीडित तरुणी

ABOUT THE AUTHOR

...view details