महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांचा राहुल गांधींवर निशाणा; म्हणाले, भारत जोडो ऐवजी काँग्रेस छोडो…

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ ( Bharat Jodo Yatra ) ही मोहिम सुरु केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांनी कन्याकुमारी येथून या यात्रेचा प्रारंभ केला. यावरून आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो ऐवजी, काँग्रेस छोडोची चिंता केली पाहिजे, असा टोला विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी लगावला आहे. ( Radhakrishna Vikhe Patil Taunt Congress Leader Rahul Gandhi Over Bharat Jodo Yatra )

Radhakrishna Vikhe Patil Press conference
राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद

By

Published : Sep 16, 2022, 3:48 PM IST

पुणे -एकीकडे देशात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर भारत जोडो यात्रा सुरू आहे. तर दुसरी कडे गोव्यात काँग्रेसचे आठ आमदारांनी फुटून भाजपमध्ये प्रवेश केले आहे. यावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Minister Radhakrishna Vikhe Patil ) यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. ते म्हणाले राज्यात काँग्रेसच अस्तित्वच दिसत नाही. राज्यात काँग्रेसचे जे मंत्री याआधीच्या सरकारमध्ये होते ते फक्त व्यक्तिगत फायद्यासाठी मंत्रिमंडळात होते.काँग्रेस वाढीसाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे ( Bharat Jodo Yatra ) पेक्षा सध्या जे काँग्रेस छोडो कार्यक्रम सुरू आहे. त्यावर लक्ष दिले पाहिजे.असा टोला पाटील यांनी काँग्रेसला लगावला आहे. पुण्यात पशुसंवर्धन आयुक्तालय येथे राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद ( Press conference of Minister Vikhe Patil ) आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. ( Radhakrishna Vikhe Patil Taunt Congress Leader Rahul Gandhi Over Bharat Jodo Yatra )

राधाकृष्ण विखे पाटलांचा राहुल गांधींवर निशाणा; म्हणाले, भारत जोडो ऐवजी काँग्रेस छोडो…



काँग्रेसने देखील भाजप च्या कार्यपद्धतीच बोध घ्यायला पाहिजे - वेदांत प्रकल्पाबाबत विखे पाटील यांना विचारल असता ते म्हणाले की महविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा परिणाम होता की अनेक उद्योगांना महाराष्ट्रात येऊस वाटत असताना देखील सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे अनेक उद्योग राज्यात आले नाही सुरवातीपासूनच तीन तिघाडी काम बिघाडी सरकार असल्याने उद्योजकांना खात्री नव्हती.पण आत्ता सरकार बदल आहे.आणि नवीन उद्योग येतील अस यावेळी पाटील म्हणाले. शिंदे सरकार मध्ये अजूनही पालकमंत्री जाहीर झालेले नाही.याबाबत विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की पुढच्या आठवड्यात पालकमंत्री बाबत निर्णय होणार आहे. कुठलही निर्णय हा थांबलेला नाही.असे यावेळी पाटील म्हणाले. काँग्रेस आणि भाजप मधील कार्यपद्धतीत काय फरक आहे.अस विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना विचारले असता ते म्हणाले की प्रत्येक पक्षाची एक कार्यपद्धती असते.आणि मला अस वाटतंय की काँग्रेसने देखील भाजप च्या कार्यपद्धतीच बोध घ्यायला पाहिजे.अस देखील यावेळी पाटील म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details