महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Molesting Woman in Pune : पुण्यात झटपट न्याय, विनयभंगप्रकरणी आरोपीला 72 तासांत सुनावली शिक्षा - Shivajinagar Court Latest News

हिंजवडी पोलिसांनी विनयभंग प्रकरणी ( molesting with woman in pune ) अटक केलेल्या आरोपीला शिवाजीनगर न्यायालयाने झटपट शिक्षा ( punishment of hard labor by shivaji nagar court ) सुनावली आहे. समीर श्रीरंग जाधव असे या आरोपीचे नाव आहे.

Pune News Update
समीर श्रीरंग जाधव

By

Published : Jan 29, 2022, 7:33 PM IST

पुणे - हिंजवडी पोलिसांनी विनयभंग प्रकरणी ( molesting with woman in pune ) अटक केलेल्या आरोपीला शिवाजीनगर न्यायालयाने झटपट शिक्षा ( punishment of hard labor by shivaji nagar court ) सुनावली आहे. समीर श्रीरंग जाधव असे या आरोपीचे नाव असून त्याला हिंजवडी पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी चार्जशीट दाखल करून पुढील 36 तासांमध्ये न्यायधीश श्रद्धा जी. डोलारे यांनी आरोपीला कलम 354 अन्वये 6 महिने, कलम 452 अन्वये 6 महिने, कलम 506 अन्वये 6 महिने अशी 18 महिन्यांची शिक्षा आणि 9 हजारांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती मुदळ यांनी दिली आहे. त्याला सर्व शिक्षा एकत्र एकाचवेळी भोगावी लागणार असल्याने त्याच्या शिक्षेचा कालावधी हा 6 महिन्यांचा असणार आहे.

न्यायालयाने सुनावली शिक्षा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 24 जानेवारी रोजी 27 वर्षीय महिला घरी असताना तिचा आरोपी समीरने विनयभंग केला होता. या घटने प्रकरणी 27 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अवघ्या 36 तासांच्या आत अटक करत त्याच्या विरोधात शिवाजी नगर न्यायालयात चार्जशीट दाखल केले होते. त्यानुसार सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी आरोपी विरोधात सबळ पुरावे सादर केले.

हेही वाचा -Mumbai Crime : कुरार पोलिसांनी ४ वर्ष मुलाच्या अपहरणाची केली उकल

ABOUT THE AUTHOR

...view details