पुणे - देशभरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना देखील शहराच्या मध्यवर्ती परुसरातील पेठांमध्ये वर्दळ वाढल्याचे चित्र आहे. मुंबई आणि पुण्याच सर्वाधिक रुग्ण सापडल्यानंतर देखील नागरिकांमध्ये गंभीरता नसल्याचे यावरून स्पष्ट होते.
तुम्ही काहीही करा.. आम्ही सुधारणार नाही! पेठांमध्ये अनावश्यक गर्दी कायम कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वत्र संचारबंदी जाहीर करण्यात आली. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी प्रशासन आणि पोलीस सर्वांना आवाहन करत आहेत. मात्र, नागरिकांना याचे कोणतेही गांभीर्य नसल्याने प्रशासनाने अधिक कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी शहराची हद्द २७ एप्रिल पर्यंत सील करण्यात आली आहे. तसेच देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ग्रीन आणि ऑरेज झोन्स मध्ये काही प्रमाणात शिथील होणार असले, तरीही नागरिकांना बाहेर नपडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, काही पुणेकर अनावश्यक गर्दी करताना दिसत आहेत.
मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आहेत. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकी आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहराची हद्द २७ एप्रिल पर्यंत सील करण्यात येत असल्याचा आदेश काढला. प्रशासनाकडून विशेष पावले उचलण्यात आले आहे. मात्र, सकाळपासूनच लोक खरेदीसाठी रस्त्यांवर येऊन गर्दी करत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर प्रशासनाकडून काही कडक पाऊले उचलली जात असताना शहरातील पेठांमध्ये मात्र गर्दी होत आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडलीय.