महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

क्रिकेटचा 'जबरा फॅन' पुणेकर; पाकविरुद्ध विजय मिळावा म्हणून विंन्टेज कार घेऊन तो पुण्यात फिरतोय - fan

आजच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी कशी होते, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान जायबंदी शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संघात जागा देण्यात आली आहे.

क्रिकेटचा 'जबरा फॅन' पुणेकर

By

Published : Jun 16, 2019, 4:00 PM IST

पुणे- क्रिकेट या खेळाला भारतात धर्म मानणारे अनेक चाहते पाहायला मिळतील. या प्रेमापोटी रसिक वाट्टेल ते करायला तयार असतात. त्यात भारत आणि पाकिस्तानचा सामना असेल तर मग विचारायलाच नको, विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत पाक सामान्य निमित्त एका पुणेकराचे क्रिकेट प्रेम जागृत झाले. 1960 सालातील 'पद्मिनी' ही जुनी कार घेऊन तिला सजवून या चाहत्याने शहरभर फिरवून भारताच्या विजयाची प्रार्थना केली.

ज्या वेळेस भारतीय संघाने १९८३ साली पहिला विश्वचषक उंचावला, त्यावेळी माझ्या वडिलांनी 'पद्मिनी' कारला अशाच प्रकारे सजवली होती. मीही वडिलांची आठवण आणि भारतीय संघ जिंकावा यासाठी प्रार्थना करून ही गाडी शहरभर फिरवणार असल्याचे या क्रिकेट चाहत्याने सांगितले.

क्रिकेटचा 'जबरा फॅन' पुणेकर

मँचेस्टरच्या मैदानावर रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात, कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभर मँचेस्टरमध्ये पाऊस पडत होता, मात्र कालपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे आजच्या सामन्यावरचे संकट टळलेले आहे. विश्वचषक इतिहासात भारताने आतापर्यंत ६ वेळा पाकिस्तानवर मात केली आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी कशी होते, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान जायबंदी शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संघात जागा देण्यात आली आहे.

आजच्या सामन्यात कोण बाजी मारतंय याकडे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष लागून आहे. देशभरात अनेक ठिकाणी भारताच्या विजयासाठी होमहवन केले जात आहे. आजचा सामना पाहण्यासाठी अनेकांनी कामावरून सुट्टी घेतली आहे. तर, अनेकांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळतंय.

ABOUT THE AUTHOR

...view details