पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 15 ऑगस्टच्या भाषणात मुलींच्या लग्नाचे वय ( Marriage Age of Women ) 18 वरुन 21 वर्ष करणार असल्याचे सांगितले होते. त्याच दृष्टीने आता केंद्र सरकार पावले उचलताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला असल्याचं देखील कळत आहे. हिवाळी अधिवेशनात सरकार हे विधेयक संसदेत मांडणार असल्याचं देखील सांगितलं जातं आहे. मुलींच्या लग्नाच्या बाबतीत हे विधेयक संसदेत मांडल्यांनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
Marriage Age of Women : मुलींचं लग्नाचं वय 18 वरून 21 वर? काय वाटतयं पुण्यातल्या तरुणाईला... - लग्नाचे वय वाढवणाऱ्या निर्णयावर तरुणाईच मत
मुलींच्या लग्नाचं ( Marriage Age of Women ) किमान वय लवकरच 18 वरून 21 वर्षे केलं जाऊ शकतं. विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. सध्या या कायद्यात मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा 18 ठेवण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायद्यात बदल करण्याच्या दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. यावर पुण्यातील तरुणाईने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रमा सरोदे
पुण्यातल्या तरुणाईची प्रतिक्रिया