महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात हुडहुडी...फक्त थंडीत नव्हे तर वर्षभर घेत आहेत जेष्ठ नागरिक अशा स्व:ताची पद्धतीने काळजी - l pune weather

भल्या पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी दुपारी ऊन तर रात्री पुन्हा थंडी असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहे. यंदा दिवाळी पाठोपाठ थंडीचा चाहूल लागली आहे. उन्हाळा आणि पावसाळा पेक्षा गुलाबी थंडी हवीहवीशी वाटत असली तरी तो अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. त्यामुळे हिवाळ्यात आनंद लुटायचा असेल तर त्यासाठी फिट असायलाच पाहिजे. त्यासाठीच पुण्यातील ज्येष्ठ नागरिक हे शहरातील विविध उद्यानांमध्ये फक्त हिवाळ्यातच नव्हे तर वर्षभर उद्यानांमध्ये येऊन ग्राउंडचे राऊंड मारणे त्याच पद्धतीने विविध योगासनाद्वारे आपण फिट असल्याचं दाखवत आहे.

Pune
पुणे न्यूज

By

Published : Nov 13, 2021, 9:44 AM IST

Updated : Nov 13, 2021, 11:15 AM IST

पुणे - शहरातील पारा जरी कमी होत असला आणि दिवसंदिवस थंडी जरी वाढत चालली तरीही पुणेकरांचा जोश मात्र नेहमीच हाय असतो. भल्या पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी दुपारी ऊन तर रात्री पुन्हा थंडी असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहे. यंदा दिवाळी पाठोपाठ थंडीचा चाहूल लागली आहे. उन्हाळा आणि पावसाळा पेक्षा गुलाबी थंडी हवीहवीशी वाटत असली तरी तो अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. त्यामुळे हिवाळ्यात आनंद लुटायचा असेल तर त्यासाठी फिट असायलाच पाहिजे. त्यासाठीच पुण्यातील ज्येष्ठ नागरिक हे शहरातील विविध उद्यानांमध्ये फक्त हिवाळ्यातच नव्हे तर वर्षभर उद्यानांमध्ये येऊन ग्राउंडचे राऊंड मारणे त्याच पद्धतीने विविध योगासनाद्वारे आपण फिट असल्याचं दाखवत आहे.

पुण्यात थंडीची चाहूल
आम्ही वर्षभर करतोय व्यायाम -पुण्यातील सरदार भरावसिंह घोरपडे उद्यानात 10 ते 15 महिलांचं एक ग्रुप असून हे सर्व महिला ज्येष्ठ असून ते दरोरोज पाहाटे 5 ते 8 वाजता या उद्यानात येऊन योगासनांची विविध प्रकार करून व्यायाम करत असतात. फक्त हिवाळ्यातच नव्हे तर वर्षभर या ज्येष्ठ महिला या उद्यानात न चुकता एकत्र येतात आणि व्यायाम करून स्वतःची काळजी घेतात. पावसाळ्यात तर या महिला उद्यानात बांधण्यात आलेल्या शेडमध्ये व्यायाम करत असतात.त्यांच्यातील व्ययामाची ऊर्जा पाहिली आणि योगासणांचे विविध प्रकार पाहिले तर एखाद्या योगा करणाऱ्या गुरूला लाजवेल अश्या पद्धतीने या महिला न चुकता येथे व्यायाम करत असतात.वर्षभर नो आजारी नो औषधगेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सर्वजण एकत्र येऊन या उद्यानात व्यायाम करत असतो. वर्षभर न चुकता दररोज याठिकाणी येत असतो. आपल्या शरीराची काळजी घेत असतो. विविध आजार तसेच अनेक समस्या ज्येष्ठ नागरिकांना असतात. मात्र या महिला दिवसातले एक ते दोन तास व्यायाम करत वर्षभर फिट राहतात. वर्षभर आम्ही आजारी देखील पडत नाही तसेच सकाळी सकाळी येऊन एक ते दोन तास व्यायाम केल्याने दिवसभर ती ऊर्जा अशाच पद्धतीने शरीरात राहते आणि मूड फ्रेश झालेला असतो असे देखील या महिलांचा म्हणणं आहे. डॉक्टरांकडे जाऊन एक ते दोन तास रांगेत उभे राहण्यापेक्षा प्रत्येकानेच सकाळी सकाळी घेऊन एक ते दोन तास व्यायाम केल्याने प्रत्येक जण हा फिट राहील असा मंत्र देखील या महिलांनी यावेळी दिला.
Last Updated : Nov 13, 2021, 11:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details