पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्यास अडचण येऊ शकते अशा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन परीक्षेचीही सोय करण्यात आली आहे. विद्यापीठाने परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळेतच ही परीक्षा घेतली जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पाहा... - sppu news
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार 1 ते 9 ऑक्टोबरला बँकलॉग विषयांची परीक्षा होणार आहेत.
पुणे विद्यापीठ
यंदा मात्र पहिल्यांदाच कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेची छायांकित प्रत दिली जाणार नाही. पुनर्मूल्यांकनही करता येणार नाही, त्यामुळे आता अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी तयारीनिशी परीक्षेला सामोरे जाणे गरजेचे आहे. परीक्षेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
पुणे विद्यापीठाने परीक्षेचे अंतिम वेळापत्रक केले जाहीर
- 1 ते 9 ऑक्टोबरला बॅकलॉग विषयांची होणार परीक्षा
- नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा 10 ते 30 ऑक्टोबर दरम्यान
- यंदा 2 लाख 48 हजार विद्यार्थी देणार परीक्षा
- परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार
- 60 मार्कांचा बहुपर्यायी (एमसीक्यू) असणार पेपर
- 50 प्रश्नांची द्यावी लागणार अचूक उत्तरं
- ऑफलाइन परीक्षा घेतली जाणार ओएम आर सीटवरती
- ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक बिघाड झाल्यास वेळ वाढवून दिला जाणार
- दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार 20 मिनिटांचा जास्त वेळ
- परीक्षेसाठी छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची नसेल सुविधा