महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Traffic Police Action : पुणे वाहतूक पोलिसांनी सामनासह दुचाकी उचलली; व्हिडिओ होतोय व्हायरल

पुण्यातील नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसानी ( Pune Traffic Police Action ) कारवाई दरम्यान क्रेनच्या मदतीने दुचाकी उचलली होती. मात्र ती दुचाकी त्या संबधीत चालकासह उचलण्यात आली होती. अशीच एक कारवाई पुण्यातील लक्ष्मी रोडवर आज 11 वाजता घडली आहे. यात वेगळे फक्त एवढे की या कारवाईत पोलिसांनी सामनासह दुचाकी उचली.

Pune Traffic Police
पुणे वाहतूक पोलिसांनी सामनासह दुचाकी उचलली

By

Published : Mar 14, 2022, 3:58 PM IST

Updated : Mar 14, 2022, 4:05 PM IST

पुणे - पुण्यातील नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसानी ( Pune Traffic Police Action ) कारवाई दरम्यान क्रेनच्या मदतीने दुचाकी उचलली होती. मात्र ती दुचाकी त्या संबधीत चालकासह उचलण्यात आली होती. त्या घटनेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता अशीच एक कारवाई पुण्यातील लक्ष्मी रोडवर आज 11 वाजता घडली आहे. यात वेगळे फक्त एवढे की या कारवाईत पोलिसांनी सामनासह दुचाकी उचली.

पुणे वाहतूक पोलिसांनी सामनासह दुचाकी उचलली

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई -

पुणे शहर हे दुचाकीचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी वापरल्या जातात. शहरातील मुख्य पेठांमध्ये तर सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. अश्या वेळेला दुचाकी किंवा चारचाकी पार्किंगमध्ये न लावल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

'रेकॉर्डिंग होत असल्याचे लक्षात येताच...'

पुण्यातील लक्ष्मी रोडवर आज सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास दोघे जण खरेदीसाठी दुचाकीवरून आले होते. पण त्यांनी पार्किंगच्या पांढर्‍यापट्टी बाहेर दुचाकी लावून खरेदीसाठी गेले. तेवढ्यात वाहतूक पोलिसांची गाडी नो पार्किंग किंवा पार्किंगच्या पांढर्‍या पट्ट्या बाहेर लावलेल्या गाडी उचलण्यासाठी आली. त्या दरम्यान एका दुचाकीमध्ये खरेदी केलेल्या साहित्य होते. त्या साहित्यासह क्रेनच्या मदतीने दुचाकी उचलण्यात आली. या कारवाईचे रेकॉर्डिंग होत असल्याचे लक्षात येताच, क्षणाचा ही विलंब न करीता गाडी सोडून दिली.

हेही वाचा -रक्षकच निघाले भक्षक..! 45 लाखांच्या लुटमारीच्या गुन्ह्यात पुण्याच्या तीन पोलिसांसह चौघांना बेड्या

Last Updated : Mar 14, 2022, 4:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details