महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune to Shirdi : पुणे ते शिर्डी साई पायी पालखी सोहळा - सामाजिक

गेल्या 2 वर्ष कोरोनामुळे पायी पालखी सोहळा होऊ शकला नव्हता, यंदा मात्र हा पायी पालखी सोहळा होत असल्याने साई भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यंदा या पालखी सोहळ्याच ३४ वे वर्ष आहे.

shirdi sai pai palkhi
शिर्डी साई पालखी

By

Published : Jul 3, 2022, 3:38 PM IST

पुणे - श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने आयोजित पुणे ते शिर्डी ( Pune to Shirdi )पायी साई पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील कसबा गणपती पासून श्री साई पालखीने प्रस्थान झाले आहे. तत्पूर्वी महंत डॉक्टर योगी विलास नाथजी महाराज आणि श्री गुरुजी तौशीर यांच्या हस्ते साई पादुकांचे पूजन करण्यात आले आहे.

शिर्डी साई पालखी

यावेळी श्री शिर्डी साईबाबा संस्थानचे व्यवस्था विश्वस्त अध्यक्ष आशुतोष काळे उपस्थित होते. गेल्या 2 वर्ष कोरोनामुळे ( Corona ) पायी पालखी सोहळा होऊ शकला नव्हता, यंदा मात्र हा पायी पालखी सोहळा होत असल्याने साई भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यंदा या पालखी सोहळ्याच ३४ वे वर्ष आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त होत असलेल्या पायी पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम वाघोली येथे असणार -पालखी सोहळ्या दरम्यान फडके हौद येथे पालखीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. कसबा गणपती पासून प्रस्थान केल्यानंतर ठिक- ठिकाणी साई भक्तांनी या पालखीचे स्वागत करण्यात आले आहे. 12 जुलै रोजी ही पालखी शिर्डी येथे पोहोचणार आहे. पायी पालखी वारी दरम्यान व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details