पुणे -देशासह राज्यावर आलेलं कोरोनाच संकट पाहता गेली २ वर्ष ही लॉकडाऊन मध्येच गेली आहेत. लॉकडाऊनमध्ये देशभरातील शाळा देखील ऑनलाईनच झाल्या होत्या. तसेच परीक्षादेखील ऑनलाईनच घेण्यात आल्या होत्या. सगळी परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असतानाराज्य शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे.अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द, रविवारी देखील शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय - राज्यातील शाळा सुरू
कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन ( Summer vacation cancelled ) एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Summer vacation
राज्यातील अनेक ठिकाणी शाळादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा, परीक्षा या ऑनलाईन झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडूनही अनेक मागण्या करण्यात येत होत्या. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहतील. विद्यार्थ्यांचे वार्षिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Last Updated : Mar 28, 2022, 7:08 PM IST