पुणे- माजी मंत्री उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेना शहर प्रमुखासह ( Pune Shiv sena president arrest ) 5 जणांना अटक करण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम आयोजित करणारे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांनादेखील अटक करण्यात आली आहे. शिवसेना शहरप्रमुख पुणे संजय मोरे ( Sanjay More arrest ) यांना उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा ( Uday Samant vehicle attack case ) प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मध्यरात्री कोथरूड पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांना माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणी पंधरा लोकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, संभाजीराव थोरवे, राजेश पळसकर,सुरज लोखंडे,चंदन साळुंखे , विशाल धनवडे.अनिकेत घुले,रुपेश पवार , इतर शिवसेना पदाधिकारी यांच्या वर भारती विद्यापीठ स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना अटक केली आहे. शिवसैनिकांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शिवसेनेचे हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांना अटक-माजी मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर काल कात्रज चौक येथे हल्ला प्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई करत शिवसेनेचे हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांना ताब्यात घेतले आहे. बबन थोरात हे शिवसेनेचे हिंगोलीचे संपर्कप्रमुख आहेत. बबन थोरात यांनी चितावथीखोर भाषण करत बंडखोर आमदारांच्या गाड्या फोडा अस वक्तव्य केले होते.या वक्तव्यानंतर पडसाद उमटले होते. पुणे पोलिसांनी मुंबईमधून बबन थोरात यांना ताब्यात घेतले आहे.
अटकेनंतर संजय मोरे यांचे ट्विट- शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांची पुण्यात दणदणीत, खणखणीत सभा पार पडली. म्हणून सरकारने शिवसैनिकांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली.अस ट्विट शहर प्रमुख संजय मोरे यांनी केले आहे.
आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी हल्ला केला. उदय सामंत यांच्या माहितीनुसार त्यांची कार ही कात्रज येथील सिग्नलला थांबली होती. त्यावेळी त्यांच्या बाजूला एक गाडी थांबली आणि त्यातून दोन जण उतरले. त्यांच्या हातात बेसबॉलची बॅट होती तर दुसऱ्याने हाताला दगड बांधला होता. त्यांनी आमदार सामंत शिव्या देण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने आलेल्या काहींच्या हातात सळ्या होत्या. या लोकांनी कारवर चढून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर उदय सामंत यांच्या ड्रायव्हरने पोलीस स्टेशनमध्ये गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.