पुणे : राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण ( Maharashtra Corona Cases Increased ) निर्माण झाले आहे. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. आज पुणे शहरात 3067 जणांना कोरोनाची लागण ( Pune Corona Cases ) झाली. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
सहा दिवसांत आढळले 15,146 रुग्ण
दुसऱ्या लाटेनंतर शहरातील रुग्णसंख्या कमी झाली होती. दररोज 100 ते 150 रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता नागरिकांकडून होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनामुळे शहरातील रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली आहे. मागील सहा दिवसांत शहरात 15 हजार 143 रुग्णांची नोंद करण्यात आली.