पुणे - जिल्ह्यातील मंचर येथे गुंड ओंकार उर्फ राण्या बाणखेले खून प्रकरणात फरार असलेल्या संतोष जाधवचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक ( team of Pune Rural Police ) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यासाठी ( interrogate gangster Lawrence Bishnoi ) दिल्लीत गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जाधव हा देखील सिद्धू मुसेवाला हत्येतील वॉन्टेड संशयित आहे.
संतोष याला पकडण्यासाठी याआधी देखील ग्रामीण पोलिसांचे पथक हे राजस्थान येथे गेले होते.आता त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा पथक हा गँगस्टार लॉरेन्स बिष्णोईची ( Ranya Bankhele ) चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कोण आहे सौरभ महाकाल? सौरभ महाकाल कांबळे हा 21 असून त्याचे बालपण नारायणगाव येथे गेले आहे. त्याचे वडील हे आळेफाटा येथे चालक म्हणून काम करतात. भाऊ शेती करतो. मिळालेल्या माहितीनुसार महाकाल याचे वडील आणि आई यांच्यात नेहेमी भांडणे होत होती. महाकाल हा जेव्हा 9 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली होती. त्यांनतर वडील हे नेहेमी दारू पित होते. मुलांकडे लक्ष देखील देत नव्हते. काही दिवसानंतर वडिलांनी दुसर लग्न करत मुलांकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सौरभ याला चुकीची संगत लागली आणि तो चुकीचे काम करायला लागला. त्यानंतर त्याची भेट ही संतोष जाधव यांच्याशी झाली आणि तो पुढे पूर्णपणे गुन्हेगारीकडे वळला.
पुणे ग्रामीण पोलिसांकडून महाकाल याला अटक-संतोष जाधव याने त्याचे साथीदारांसह मिळून ओंकार उर्फ राण्या आण्णासाहेब बाणखेले याचा पिस्टलमधून गोळीबार करून खुन केलेबाबत मंचर पोलीस स्टेशनमध्ये दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल होता. आरोपी संतोष सुनिल जाधव हा फरारी आरोपी होता व त्याचे अटकेकरीता अटक वॉरंट काढण्यात आलेले होते. संतोष जाधव यास पकडण्याकरता पथकास सूचना दिल्या होत्या.संतोष हा फरार असताना सीरम ऊर्फ सिध्देश ऊर्फ महाकाल हिरामण कांबळे याने त्याला आसरा दिला होता. 8 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरजवळ, पुणे, अहमदनगर जिल्हयाच्या सिमेवरून महाकाल याला ताब्यात घेतलेल असून त्यास न्यायालयाकडून त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी देखील देण्यात आली आहे.
अशी होऊ शकते चौकशी-सध्या महाकाल हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत 20 जून पर्यंत असून त्याची पंजाब पोलीस, दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलीस चौकशी करत आहे .त्यांना जर अजून चौकशी करायची असेल तर ते महाकाल याच्या कोठडीसाठी न्यायालयातदेखील जाऊ शकतात. कालच मुंबई पोलिसांकडून महाकाल याची सलमान खान धमकी प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे.
काय म्हणाला चौकशीत-पंजाबमधील गायक, काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर फरार झालेला गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून काल चौकशी करण्यात आली. याच चौकशीदरम्यान अनेक खुलासे महाकाल याने केल्याची माहिती समोर आली आहे. महाकाल हा बिष्णोई टोळीचा सदस्य आहे. महाकाळने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बिष्णोईचा सहकारी विक्रम बराडने तीन लोकांच्या माध्यमातून हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचविले. 'सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू' असे या पत्रात लिहण्यात आले होते.
लॉरेन्स बिष्णोईने हे पत्र सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावे पाठविले होतं. राजस्थानमधील जलोरी येथून बिष्णोई टोळीचे तीन जण मुंबईमध्ये आले होते. त्यांनीच हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवलं. तसेच त्यांनी सौरभ महाकालचीही यावेळी भेट घेतली," असं पोलिसांनी चौकशीदरम्यान समोर आल आहे.
मी पंजाबला गेलोच नाही-मुसेवाला हत्या प्रकरणात सौरभ महाकालची चौकशी सुरू असून मी पंजाबला गेलो नव्हतो, असा दावा महाकाल याने केला आहे. त्याचे शिक्षण सातवीपर्यंत झाले असून 'आळेफाटा येथे त्याचे वडील चालक म्हणून काम करतात. मी आणि भाऊ शेती करतो, असे त्याने चौकशीत सांगितले. मंचरमधील गुंड ओंकार उर्फ राण्या बाणखेले खून प्रकरणात संतोष जाधवला सिद्धेश कांबळे उर्फ महाकालने आश्रय दिला होता. ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यावन्ये (मोक्का) कारवाई केली.
हेही वाचा-lawrence bishnoi afraid of encounter : लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलिसांकडून एन्काउन्ट होण्याची भीती, सुरक्षा वाढविण्याची न्यायालयाला विनंती
हेही वाचा-लॉरेन्स बिश्नोईनेची आंतरराज्य टोळी; सिद्धू मुसेवालाला मारायला गेला होता शाहरुख