महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दौंड तालुक्यातील अवैध वाळू उपशावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

दौंड तालुक्यातील खानोटा येथे अवैध वाळू उपशावर पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण 58 लाखांचा माल जप्त करण्यात आला. तसेच 14 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

Pune rural police action on illegal sand smugglers
अवैध वाळू उपस्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

By

Published : Jan 13, 2020, 9:12 AM IST

पुणे -दौंड तालुक्यातील खानोटा येथे भीमा नदी पात्रातून वाळू उपसण्याची परवानगी नसतानाही अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर बारामती क्राईम ब्रँचने कारवाई केली. या कारवाईत एकूण 58 लाख रुपयांचा माल भीमा नदीपात्रातून जप्त करण्यात आला आहे. तसेच वाळू उपसा करणाऱ्या बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी 7 बोटी चालक आणि 7 मालक अशा एकूण 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

दौंड तालुक्यातील खानोटा येथे अवैध वाळू उपस्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई...

हेही वाचा... 'माझी लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे, हा तर मराठी मातीचा अपमान'

खानोटा येथे वाळूची तस्करी होत आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली. त्यांनी बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना याबाबत सांगून या ठिकाणी छापा मारण्यास सांगितले. त्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन हद्दीत खानोटा येथे जात पोलिसांनी अचानक छापा टाकला टाकला. या छाप्यात 7 फायबर बोटी आणि 8 लहान लोखंडी बोटी, वाळू काढण्याचे इंजन असा एकूण 58 लाख रुपयांचा मुद्देमाल भीमा नदीपात्रातून जप्त करण्यात आला.

हेही वाचा... "काँग्रेस-राष्ट्रवादीवाले नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील"

दौंड पोलीस स्टेशनमध्ये 7 बोटींचे चालक आणि मालक अशा एकूण 14 आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीज हजरत शेख, रवसन हिजबुल शेख, बबलू मन्नान शेख, मोहम्मद नूर सलीम शेख, सराफत मुस्तफा शेख, संयुब नूरज शेख, मोहम्मद मद सबिक शेख अशी आरोपींची नावे असून हे सर्वजण झारखंडचे रहिवासी आहेत. तर संतोष बाळासाहेब भोसले, पप्पू कवडे, मारुती शिंदे, दत्ता गायकवाड, प्रशांत उर्फ पप्पू गायकवाड, बाबू कुमार भोसले, शंकर कवडे अशी वाळू माफिया बोटी मालकांची नावे आहेत.

हेही वाचा... सीसीटीव्हीच्या आधारे दोन तासातच लागला चोरट्याचा शोध

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव त्यांचे सहकारी, आरसीपी पथकातील 14 पोलीस जवान यांनी केली. तसेच भिगवण पोलीस स्टेशन, दौंड पोलीस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांचेही यांत सहकार्य मिळाले. महसूल विभागातील मंडल अधिकारी मंगेश नेवसे आणि तलाठी जयंत भोसले, दिपक पांढरपट्टे, यादव कोतवाल अशोक भोसले यांनी कारवाईत सहभाग घेत दौंड पोलिसांच्या मदतीने सर्व बोटींचा स्फोटकांच्या सहाय्याने नाश केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details