पुणे - बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणून ओळखली जाणारी राखी पौर्णिमा सोमवारी (दि.3) आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा करतो. यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत.
रक्षाबंधन विशेष : चॉकलेटच्या राख्या खरेदीसाठी बच्चेकंपनीची झुंबड - पुणे रक्षाबंधन बातमी
चॉकलेटच्या राख्याही बाजारात उपलब्ध आहेत. चॉकलेट हा पदार्थ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता असल्यामुळे या राख्यांना चांगली मागणी आहे.
लहान मुलांचे आवडते कार्टून असलेल्या सुपरमॅन, स्पायडरमॅन, मोटू पतलू, निन्जा, हथोडी यांची ओळख सांगणाऱ्या अनेक प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. या राख्यांसोबत आणखी एका नवीन राखीचा पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे आणि तो म्हणजे 'चॉकलेट राखी'.
बाजारात अगदी दोन रुपयापासून ते हजारो रुपयापर्यंत राख्या उपलब्ध आहेत. यामध्ये दोरा, मनी, रुद्राक्ष, लेस ते सोने-चांदी यांच्यापासून तयार केलल्या राख्यांचा यामध्ये समावेश आहे. या राख्यांमध्ये थोडासा बदल म्हणून खाता येतील अशा चॉकलेटच्या राख्याही बाजारात उपलब्ध आहेत. चॉकलेट हा पदार्थ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता असल्यामुळे या राख्यांना चांगली मागणी आहे.
सोमवार पेठेतील विक्रम मूर्ती यांच्या बेकरी शॉपमध्ये या राख्या तयार करण्यात आल्या आहेत. याविषयी अधिक माहिती सांगताना मूर्ती म्हणाले, मागील सात वर्षांपासून मी अशा प्रकारच्या राख्या तयार करतो. वितळणार नाहीत अशा प्रकारचे पदार्थ राख्या तयार करताना आम्ही वापरले आहेत. त्यामुळे या राख्या चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये न ठेवताही टिकू शकतात.
दरवर्षी या चॉकलेट राख्यांना मोठी मागणी असते. परंतु, यंदा कोरोनाव्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर या राख्यांच्या मागणीत काहीशी घट झाली. यामुळे काही प्रमाणात व्यावसायिकांना नुकसान सोसावे लागत असल्याचेही मूर्ती यांनी सांगितले.