महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 16, 2022, 5:06 PM IST

ETV Bharat / city

Azadi Ka Amrit Mahotsav : रेल्वेकडून आजादी का अमृत महोत्सव; स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानासाठी गॅलरी उभारणार

आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त ( azaadi ka amrutmohatsav ) पुणे रेल्वेकडून ( Pune Railway ) स्वातंत्र्यसैनिकाची एक गॅलरी पुणे स्टेशनवर तयार केली जाणार आहे. यामध्ये स्टेशनच्या बाहेर शनिवार वाड्याची ( Shaniwar Wada ) प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना बोलवून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

Azadi Ka Amrit Mahotsav by Railways
रेल्वेकडून आजादी का अमृत महोत्सव

पुणे -भारतीय रेल्वेकडून ( Indian Railways ) सोमवारी आजादी का अमृत महोत्सव ( azaadi ka amrutmohatsav ) साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त रेल्वेकडून ( Pune Railway ) स्वातंत्र्यसैनिकाची एक गॅलरी पुणे स्टेशन तयार केली जाणार आहे. महाराष्ट्रासह पुणे, सातारा स्टेशनवर सोमवारी याचे आयोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर स्टेशनच्या बाहेर शनिवार वाड्याची प्रतिकृती साकारणार आहे. तिथे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना बोलवून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

हेही वाचा -Monsoon Session of Parliament : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक

आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त रेल्वे इमारतीला डेकोरेशन केले जाणार आहे. आठवडाभर वेगवेगळे डिजिटल बोर्ड ईमारती बाहेर लावले जाणार आहेत. यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास, त्यांच्याविषयीआठवण, त्यातून साकारला जाणार आहे. त्याशिवाय धावणाऱ्या रेल्वेमध्येसुद्धा स्वातंत्र्यसैनिकांना हायलाईट केले जाणार आहे . त्याचबरोबर आजादीच्या अमृत लोगो रेल्वेमध्ये डिजिटल बोर्डावरती प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

हेही वाचा -Supriya Sule Criticized New Government in Pune : पेट्रोल-डिझेलचे भाव कमी; ये सब गोलमाल है : सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details