पुणे -आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावी याला पुणे पोलीस तपासासाठी मुंबईला घेऊन गेले आहेत. त्याच्या घराची आणि कार्यालयाची तपासणी करण्यासाठी पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आले. त्यामुळे मुंबई येथील तपासात आणखी कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागतायेत पहावे लागेल.
- पुणे पोलिसांकडे 4 तक्रारी -
पुणे पोलिसांकडे किरण गोसावीने फसवणूक केल्याच्या आणखी चार तक्रारी आल्या आहेत. त्यांची देखील नोकरीच्या आमिषानेच आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. यातील तीन तरुण हे लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तर एक वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशी आहे. त्यांना संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगण्यात आले आहे.
- किरण गोसावी याला 8 दिवसांची पोलीस कोठडी -
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा पुण्यातील गुन्हे शाखाकडून गोसावीला अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याच सांगितले जात होते. दरम्यान, काल पुण्यातील कामशेत भागात किरण गोसावी येऊन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. अखेर पुणे पोलिसांकडून गोसावीला अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांनी 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
- याआधी गोसावीच्या महिला सहकाऱ्याला अटक -
फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला सहकाऱ्याला यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी, असे त्या महिलेचे नाव आहे. शेरबानो कुरेशीसह गोसावीने पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती.
- किरण गोसावी विरोधात लुकआऊट नोटीस -