पुणे- कोरोना काळात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या टाळेबंदीत मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध लावले आहे. अशातच मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन जात असताना हा गुटखा पुणे पोलिसांनी जप्त केला आहे. सोलापूर पुणे महामार्गावरुन ( Solapur Pune Highway ) कर्नाटकाहून पुण्याच्या दिशेने जाणार कंटेनर शनिवारी मध्यरात्री हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत 75 लाख रुपये असल्याचे सांगितले जात ( Pune Police Seized Gutkha ) आहे.
Pune Police Seized Gutkha : पुणे पोलिसांनी जप्त केला तब्बल 75 लाखांचा गुटखा - सोलापूर पुणे महामार्ग
पुणे पोलिसांनी सोलापूर पुणे महामार्गावर ( Solapur Pune Highway ) हडपसर येथील टेकवडे आकाशवाणी केंद्रासमोर तब्बल 75 लाख रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केली ( Pune Police Seized Gutkha ) आहे. हा गुटखा एका कंटेनरमधून कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने नेण्यात येत होता.
350 पेक्षा अधिक पोत्यांमध्ये गुटखा -वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. अशी स्थिती असताना शनिवारी रात्री कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने हा गुटखा नेला जात होता. हडपसर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सोलापूर पुणे महामार्गावरील ( Solapur Pune Highway ) हडपसर येथील टेकवडे आकाशवाणी केंद्रासमोर हा कंटेनर अडवण्यात आला. त्यानंतर कंटेनरची तपासणी केली असता त्यात 350 पेक्षा जास्त पोत्यांमध्ये गुटखा व सुगंधित तंबाखू आढळली.
हेही वाचा -Chandrakant Patil : पुणे शहरासाठी विमानसेवेचा विस्तार होणे आवश्यक - चंद्रकांत पाटील