महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune police seized swords : औरंगाबादनंतर पिंपरी-चिंचवडमधून 97 तलवारी घेतल्या ताब्यात - pune police

औरंगाबाद येथे कुरिअर कंपनीमधून तलवारीचा शस्त्रसाठा जप्त केल्याची घटना ताजी असताना पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरातून तब्बल 97 तलवारी, 2 कुकरी आणि 9 म्यान जप्त करण्यात आले आहेत.

Pune police
Pune police

By

Published : Apr 4, 2022, 6:44 PM IST

पिंपरी-चिंचवड - औरंगाबाद येथे कुरिअर कंपनीमधून तलवारीचा शस्त्रसाठा जप्त केल्याची घटना ताजी असताना पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरातून तब्बल 97 तलवारी, 2 कुकरी आणि 9 म्यान जप्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पंजाबमधून औरंगाबाद आणि अमहमदनगर येथे हा शस्त्रसाठा कुरिअरने पाठविला जात होता. त्याआधीच दिघी पोलिसांनी तो जप्त केलाय. नेमका हा शस्त्र साठा कशासाठी मागवला जात होता. हे आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच पुढे येणार आहे. या प्रकरणी उमेश सूद (पंजाब), अनिल होण (औरंगाबाद), मनिंदर (पंजाब) , आकाश पाटील (अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहे.

पिंपरी-चिंचवडमधून 97 तलवारी घेतल्या ताब्यात
दिघी येथील एका खासगी कुरियर कंपनीच्या गोडाऊनमध्ये दोन लाकडी बॉक्समधून तलवारीचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी खासगी कुरिअरच्या मॅनेजरला येणारी कुरिअर एक्सरे मशीनने स्कॅन करण्यास सांगितली होती. कुरिअर असलेल्या गोडाऊनमध्ये विविध पार्सल स्कॅन केले. तेव्हा दोन लाकडी बॉक्समध्ये तलवारी आढळल्या.
उमेशने अनिलला दिले पार्सल
पंजाबचा रहिवाशी असलेला उमेशने औरंगाबाद येथील अनिल होणला पार्सल केले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका बॉक्समध्ये तलवारी आढळल्या. पंजाब येथील रहिवासी असलेल्या मनिंदरने अहमदनगर येथील आकाश पाटीलला कुरिअर केले होते. या प्रकरणात 97 तलवारी, 2 कुकरी आणि 9 म्यान पोलिसांनी जप्त केल्या आहेत. एवढा मोठा शस्त्रसाठा कुठे आणि कशासाठी वापरला जाणार होता हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असेल. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे हे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details