महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे पोलिसांचे गुटखा विक्रेत्यांवर छापे, 48 लाखाच्या गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ जप्त - ४८ लाखांचा गुटखा जप्त

अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असून गुरुवारी अनेक दुकानांवर छापेमारी करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 47 लाख 96 हजार रुपयांच्या गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. एकाच दिवशी छापे टाकण्यात आल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Pune police raids gutka sellers
पुणे पोलिसांचे गुटखा विक्रेत्यांवर छापे

By

Published : Nov 20, 2020, 9:51 PM IST

पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असून गुरुवारी अनेक दुकानांवर छापे टाकले. या दरम्यान पोलिसांनी 47 लाख 96 हजार रुपयांच्या गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले असून 31 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे पोलिसांचे गुटखा विक्रेत्यांवर छापे
पोलिसांनी शहरातील हडपसर, मुंढवा, चंदननगर, येरवडा, सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून 22 लाख 27 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. त्यानुसार विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकूण १२ गुन्हे दाखल करण्यात आले. तर गुन्हे शाखेने स्वारगेट, भारती विद्यापीठ, चंदननगर, चतुश्रृंगी, कोथरुड, समर्थ, हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून 25 लाख 68 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. गुरुवारी एकाच दिवशी छापे टाकण्यात आल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाईत एकूण 31 गुन्हे दाखल करुन 42 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 47 लाख 96 हजाराचा गुटखा जप्त केला गेला.

ABOUT THE AUTHOR

...view details