महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mhada Exams Paper Leak : म्हाडाचे पेपर फोडणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांकडून अटक - म्हाडा भरती पेपर फुटी

पुणे सायबर पोलिसांनी आज रविवारी होणाऱ्या म्हाडाच्या (MHADA Exam) परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या (Mhada Exams Paper Leak) तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Mhada Exams Paper Leak
म्हाडा पेपर

By

Published : Dec 12, 2021, 12:51 PM IST

पुणे -आरोग्य विभागाचे (Maharashtra Health Department) पेपर फोडणाऱ्यांवर मोठी कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी (Pune Police Cyber Cell ) आज रविवारी होणाऱ्या म्हाडाच्या (MHADA Exam) परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या (Mhada Exams Paper Leak) तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संबंधीचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या तिघांना अटक
पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला -आज राज्यभरात म्हाडाचा पेपर होणार होता. मात्र, पेपर फुटल्याच संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. यामागचे कारणही तसेच आहे. ज्या जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख व दोन एजंट हे रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली. हा पेपर रात्रीतून रद्द करण्यात आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता. हा पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला याच्यामागे कोण मोठे सूत्रधार आहेत. याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. हा पेपर कशा पद्धतीने फुटला जाणार होता. कशा पद्धतीने पुणे पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याचबरोबर लष्कर भरतीचाही पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला. यामागे क्लास चालवणारे मोठ्या प्रमाणावर असतात असा संशय पुणे पोलिसांना होता आणि त्याच आधारे म्हाडा पेपरफुटीचे बिंग फुटले गेले आणि पोलिसांनीही कारवाई केली.
तिघांना सायबर पोलिसांकडून अटक -
प्रितेश देशमुख (रा. पुणे), संतोष हरकळे आणि अंकुश हरकळे (रा. बुलढाणा) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. प्रितेश देशमुख हा म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीचा अधिकारी असून संतोष व अंकुश हे त्याचे मित्र आहेत. देशमुखने आपल्या मित्रांच्या मदतीने म्हाडाचा पूर्वपरिक्षेचा पेपर फोडल्याचे सायबर पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी रात्री उशिरा तिघांना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details