महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Paper Leak Scam : पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गोपीचंद सानपला पुणे पोलीसांनी केली अटक - पेपर फुटी प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार गोपीचंद सानप याला पोलीसांनी ( Pune Police arrests main accused in paper leak scam ) आता अटक केली आहे. आज दुपारी गोपीचंद सानपला कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पुणे पोलीसांनी दिली आहे.

Paper Leak Scam
Paper Leak Scam : पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गोपीचंद सानपला पुणे पोलीसांनी केली अटक

By

Published : Feb 26, 2022, 10:57 AM IST

पुणे -पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गोपीचंद सानपला पुणे पोलीसांनी अटक ( Pune Police arrests accused in paper leak scam ) केली आहे. आरोग्य विभाग गट क पेपर फोडणारा मुख्य एजंटला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली. आरोग्य पेपर फुटीतला हा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगितलं जातं आहे.

गोपीचंद सानप असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून पुणे पोलिसांनी त्याला बुलढाण्यातून अटक केली आहे. पेपर फुटीच प्रकरण जेव्हापासून सुरू झालं. तेव्हापासून पोलीस सानपचा शोध घेत होते. मात्र, तो दोन महिन्यांपासून फरार होता. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी जीवन सानप याचा भाऊ संजय सानप यास तपास पथकाने अटक केल्यानंतर गोपीचंद सानप हा फरार झाला होता.

राज्यात जे काही पेपरफुटीचं प्रकरण झाले आहे. त्यात पेपर फोडणाऱ्या टोळीतील जीवन सानप व गोपीचंद सानप हे दोन प्रमुख गट कार्यरत होते. त्यातलाच मुख्य सूत्रधार गोपीचंद सानप याला पोलीसांनी आता अटक केली आहे. आज दुपारी गोपीचंद सानपला कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पुणे पोलीसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details