पुणे- नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात एकत्रित कारवाया (काेबिंग ऑपरेशन) करून गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. बुधवारी रात्री सायंकाळी दहा ते गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान कारवाया करण्यात आल्या. यादरम्यान पोलिसांनी दाेन हजार 893 गुन्हेगारांची तपासणी केली असता त्यापैकी 756 गुन्हेगार मिळून आले. प्रतिबंधात्मक कारवाईच्या 414 खटल्यांमध्ये 443 आराेपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 16 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी
या कारवाईत 176 जणांना सीआरपीसी कलम 149 नुसार नाेटिसा बजाविण्यात आल्या आहेत. शस्त्रास्त्र कायद्यानुसार एकूण आठ गुन्हे दाखल करून आठ आराेपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून सात पिस्टल, एक गावठी कट्टा व नऊ काडतुसे असा दाेन लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी 66 गुन्हे दाखल करून त्यात 66 आराेपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 48 काेयते, 14 तलवारी, एक कुकरी, पाच पालघन, एक चाकू, दाेन सत्तूर, दाेन लाकडी साेटे असा 17 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.