पुणे -पुणे शहरातील धनकवडी भागामध्ये कोयता (Koyta Gang) आणि हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्या सहा गुन्हेगारांची सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Pune) बालाजी नगरमधून धिंड काढली. याबाबतची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केली होती. त्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झाले आणि कोयता गँगमधील अनेकांना अटक केली होती.
Pune Police : 'ईटीव्ही भारत'च्या बातमीचा दणका; पुणे पोलिसांनी कोयता गँगची काढली धिंड - Koyata gang accused rally in sahakar nagar
पुणे शहरातील धनकवडी भागामध्ये कोयता (Koyta Gang) आणि हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्या सहा गुन्हेगारांची सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Pune) बालाजी नगरमधून वरात काढली. परिसरातील नागरिकांवरची भीती कमी व्हावी आणि परत गुन्हेगारांकडून अशा घटना घडू नये यासाठी आरोपींची पोलिसांनी त्याच परिसरातून वरात काढली.
परिसरातील नागरिकांवरची भीती कमी व्हावी आणि परत गुन्हेगारांकडून अशा घटना घडू नये यासाठी आरोपींची पोलिसांनी त्याच परिसरातून वरात काढली. पुण्यातील कोयता गँगचे वृत्त प्रसारित केल्यानंतर पोलीस प्रशासन तात्काळ कामाला लागले होते. कोयता गॅंगवरती सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गँगमधील अनेक आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
फरार आरोपींचा शोध सुरु - कोयता गॅंगच्या 6 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रविवारी सोशल मीडियावर गुंडांनी काही जणांना मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून आज त्यांची धनकवडी भागातील बालाजीनगर येथून वरात काढली आहे. यापूर्वी आरोपीने गुन्हे केलेले आहेत, अजून चार आरोपींना अटक करायची आहे, त्यांना आठ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी दिली आहे.