महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Police : ए.टी.एम. फोडणारी टोळी जेरबंद, दहा लाख रूपये व बाईक जप्त - दहा लाख रूपये व बाईक जप्त

यवत गावच्या हद्दीतील पुणे सोलापूर हायवे लगत बँक ऑफ महाराष्ट्रचे ए.टी.एम. मशीन मधून २३लाख ८०हजार ७०० रुपये चोरले. आणि टोळीतील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांनी अटक केली आहे.

Pune police
Pune police

By

Published : Jan 23, 2022, 1:33 PM IST

दौंड - यवत गावच्या हद्दीतील पुणे सोलापूर हायवे लगत बँक ऑफ महाराष्ट्रचे ए.टी.एम. मशीन मधून २३लाख ८०हजार ७०० रुपये चोरले. आणि टोळीतील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांनी अटक केली आहे . सदर आरोपींकडून दहा लाख रूपये व चोरीची मोटार सायकल पोलीस पथकाने जप्त केली आहे.

तपासासाठी चार पोलीस पथके :
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक अशोक शेळके व यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहा पोलीस निरीक्षक संदीप येळे, पोलीस उप निरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे व यवत पो.स्टे. चे पो.स.ई. संजय नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहा फौज तुषार पंदारे, पोलीस हवालदार राजू मोमीन, अजित भुजबळ,आसिफ शेख, अजय घुले,प्रमोद नवले, विजय कांचन,चंद्रकांत जाधव, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, प्रसन्ना घाडगे, मुकुंद कदम. म.पो.शि. पुनम गुंड व यवत पो.स्टे. कडील पो.हवा. गुरू गायकवाड , निलेश कदम, मारूती बाराथे, रामदास जगताप,महेंद्र चांदणे यांची चार पथके तयार करून तपासकामी रवाना केलेली होती.

तीन जणांना अटक :
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस पथकांना माहिती मिळाली की, अजय रमेशराव शेंडे,याने त्याच्या साथीदारांसह केलेला आहे. त्यावरून सदर आरोपीस सहजपुर येथून २० जानेवारी रोजी पोलीस पथकाने ताब्यात घेऊन तपास केला . त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथिदार शिवाजी उत्तम गरड, ऋषीकेश काकासाहेब किरतिके, व त्याचे इतर २ फरार साथीदारांसह केला. त्यावरून अजय शेंडे, शिवाजी गरड व ऋषीकेश किरतिके यांना गुन्हयाच्या तपासासाठी अटक करण्यात आले. गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी अजय शेंडे याचेकडून रू. १०,००,००००/- रोख रक्कम व गुन्हा करण्याकरीता वापरलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.

आरोपींकडून पुढील गुन्हे उघडकीस आले
१) कुरकुंभ येथील स्टेट बँक ऑफ इंडीया या बँकेचे दि. १६/०१/२०२२ रोजी पहाटे ए.टी.एम. चोरी करण्याचा प्रयत्न केला.
२) वाशीम येथील घरफोडी चोरी करून १,८४,०००/- किंमतीचे १२ तोळे सोने व लॅपटॉप चोरले.
. ३) गातेगाव पोलीस स्टेशन हद्दीत ए.टी.एम. मशीन गॅस कटरने तोडून रू. ७,६७,०००/- रोख रक्कम चोरले.
४) यवत व कुरकुंभ पो.स्टे. हद्दीत गुन्हा करण्याकरीता वापरलेली मोटार सायकल ही लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरले.

युटयुबवरून घेतले चोरीचे धडे
अजय शेंडे हा सहजपुर मध्ये राहणारा असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांच्याकडे ऋषीकेश किर्तीके हा कामासाठी येत होता. त्यांनतर शिवाजी गरड यानेही अजय शेंडे याचेशी कामासाठी ओळख केली होती. फरार साथिदार, शिवाजी गरड़ व अजय शेंडे यांनी पैसे कमावण्यासाठी घरफोडी करण्याचा व ए.टी.एम. चोरी करण्याचा प्लॅन तयार केला. अजय शेंडे याने यु टयुबवरून घरफोडी, ए.टी.एम. चोरी कशी करावी याची माहीती गोळा केली. याव्यतिरीक्त टोळीवर ३ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संजय नागरगोजे हे तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details