महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Police : पुणे पोलीस ऍक्शन मोडमध्ये; विना मास्क फिरणाऱ्यांवर होणार कारवाई

वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्या (Corona Cases Hike) पाहता पुणे पोलीस (Pune Police) आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विना मास्क फिरणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

pune police
पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे

By

Published : Jan 5, 2022, 11:29 PM IST

Updated : Jan 6, 2022, 3:25 AM IST

पुणे - पुणे शहरात (Pune City) गेल्या काही दिवसांपासुन वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्या (Corona Cases Hike) पाहता पुणे पोलीस (Pune Police) आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विना मास्क फिरणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत याबाबत सूचना दिल्या होत्या.

डॉ. रवींद्र शिसवे - सह पोलीस आयुक्त
  • पुणे पोलिसांचे नागरिकांना आवाहन -

शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरात 9 दिवसांआधी शहरातील कोरोनाची दैनंदिन संख्या ही शंभरच्यापटीत होती. पण सातत्याने ही रुग्ण संख्या वाढत आहे. आज ही रुग्णसंख्या 1805 झाली आहे. याचा अर्थ असा की तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. या लाटेला जर आटकाव घालायचा असेल तर सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्यावतीने मास्क घालणं आणि सोशल डिस्टनसिंगबाबत शिथिलता देण्यात आली होती. पण आता वाढत्या कोरोना रुग्णसंख्या पाहता निर्बंध कडक करण्याची वेळ आली आहे. आता नागरिकांनी शिस्त पाळावी म्हणून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाईची मोहीम पुणे पोलिसांच्यावतीने घेण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत सहकार्य केले असेच सहकार्य आताही करावे आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावावा, असे आवाहन पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

Last Updated : Jan 6, 2022, 3:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details