महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mokka Against Criminals : गुन्हेगारांना फुटला घाम; पुणे पोलीस आयुक्तांची 100 टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ( Pune Police Commissione ) यांनी 20 सप्टेंबर 2020 ते 07 ऑक्टोबर 2022 या दोन वर्षाच्या काळात 100 टोळ्यावर मोका अंतर्गत कारवाई ( Pune Police Commissioner Amitabh Gupta ) केली आहे. यात 670 आरोपींचा समावेश आहे.

Pune Police's first action under Mokka
पुणे पोलिसांची मोक्का अंतर्गत पहिलीच कारवाई

By

Published : Oct 7, 2022, 4:34 PM IST

पुणे -पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ( Pune Police Commissione ) यांनी 20 सप्टेंबर 2020 ते 07 ऑक्टोबर 2022 या दोन वर्षाच्या काळात 100 टोळ्यावर मोका अंतर्गत कारवाई ( Pune Police Commissioner Amitabh Gupta ) केली आहे. यात 670 आरोपींचा समावेश आहे. दोन वर्षात 100 मोक्का अंतर्गत कारवाई करणारे राज्यातील पहिलेच अधिकारी म्हणून आत्ता पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ( Police Commissioner Amitabh Gupta ) याची ओळख झाली आहे. नुकतच सायबर पोलीस स्टेशन कडून संघटित गुन्हेगारी करून आर्थिक फायदा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारा गुन्हेगार धीरज भारत पुणेकर वय 36 वर्ष रा.सोलापूर ( टोळी प्रमुख ) ला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याचे टोळीतील इतर आठ साथीदार यांचे आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत कारवाई ( Mokka Against Criminals ) करण्यात आली आहे. सायबर पोलीस स्टेशन अंतर्गत ही पहिली मोका कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांची मोक्का अंतर्गत पहिलीच कारवाई

मोक्का अंतर्गत पहिलीच कारवाई -कर्ज वापरकर्ताच्या मोबाईल हॅन्डसेटमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून ते चालू झाल्यानंतर यूजर हॅन्डसेटचा कॅमेरा, कॉन्टॅक्ट,लोकेशन,एस,एम,एस स्टोरेज,गॅलरी या परमिशन Allow करण्याचा मेसेज मोबाईलच्या होम स्क्रिनवर प्राप्त होतो. या सर्व परमिशन युजरने दिल्यानंतर युजरच्या हॅन्डसेट मधील सर्व डेटाचा अ‍ॅक्सेस संबंधित लोन अ‍ॅल्पीकेशन्स पुरविणाऱ्या कंपनीस जातो. डेटाचा अ‍ॅक्सेस मिळाल्यानंतर तो सर्व डेटा संबंधित कंपनी क्लोन करून त्याच्या सव्हरवर साठवून ठेवते. कर्जाची रक्कम प्रोसेसिंग फी वजा करून युजरचे अकाऊंटमध्ये डिपॉझिट झाल्यानंतर ७ दिवसाचे आत ३० ते ३०० टक्क्यापर्यंत अधिकचे व्याज आकारून त्यांची परतफेड करण्यास सांगतात. युजरने जर कर्जाची रक्कम, त्यावरील आकारलेले मुद्दल, व्याजाची रक्कम भरून देखील कंपनीने नेमलेल्या कॉलरकडून युजरला पुन्हा पैसे भरण्यासाठी कॉल येण्यास सुरुवात होते. या कॉलवर सक्तीने पैसे भरण्यासाठी मानसिक त्रास दिला जातो. या लोन अ‍ॅपच्या अनुषंगाने खंडणी स्विकारून फसवणुक केलेबाबत सायबर पोलीस स्टेशन येथे आरोपी धिरज भारत पुणेकर, वय-३६ वर्षे, रा. घर नं. ७५, संजयनगर, कुमठेनाका, सोलापुर (टोळी प्रमुख) त्याचे टोळीतील इतर आठ साथीदार यांचेवर गुन्हा दाखल आहेत.

आरोपी धीरज पुणेकर यांच्यासह आठ साथीदार कारवाई -यातील आरोपी नामे १) धिरज भारत पुणेकर वय ३६ वर्षे रा. घर नं.७५, संजयनगर, कुमठेनाका, सोलापुर(टोळी प्रमुख) २) स्वप्नील हनुमत नागटिळक, वय २९ वर्षे सध्या रा. पापाराम नगर विजापुर रोड सोलापुर, मुळ रा. वसाहत नं.२ चाँदतारा मशिदीसमोर विजापुर सोलापुर ३) श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड, वय २६ वर्षे रा. प्लॅट नं. ४०१ शिवशक्ती चौक त्रिवेणीनगर भेकराईनगर फुरसुंगी हडपसर पुणे ४) प्रमोद जेम्स रणसिंग, वय ४३ वर्षे रा. प्रियदर्शनी सोसायटी प्लॅट नं. ४ मुमताजनगर कुमठेनाका सोलापुर ५) सॅम्युअल संपत कुमार वय ४० वर्षे रा. ४०४ एमबीआर सुर्वे अपार्टमेंट डिकोजा रोड बेलातुर बंगलोर राज्य कर्नाटक ६) सय्यद अकिब पाशा, वय २३ वर्षे रा. गंगा मोगोली रोड लस्सी शॉप जवळ हसकोटे जिल्हा बेंगलोर राज्य कर्नाटक ७) मुबारक अफरोज बेग, वय २२ वर्षे रा न्यु चैतन्य हॉस्पिटल जवळ हसकोटे बस स्टॉपजवळ जिल्हा बेंगलोर राज्य कर्नाटक ८) मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम, वय ४२ वर्षे रा. बरांदीयल हाऊस अरूर पोस्ट पुरामेरी कोझीकोड अरुर केरळ ९) मोहम्मद मनियत पिता मोहिदु वय ३२ वर्षे रा. मनियत हाऊस, तालुका पडघरा, जिल्हा कलिकत, राज्य केरळ यांनी टोळी प्रमुख धिरज भारत पुणेकर याचे नेतृत्वाखाली संघटित टोळी तयार करून मागील १० वर्षात खोट्या जाहिरातीव्दारे आर्थिक फायदा देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक केली आहे. या टोळीवर अपहाराच्या रकमेतून शासकीय कंत्राट मिळवुन शासनाची फसवणुक करणे, कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करणे, अवैध कर्जाच्या वसूलीसाठी खंडणी मागणे, अवैध मार्गाने स्वतःसाठी इतरांसाठी गैरवाजवी आर्थिक लाभ, इतर फायदे मिळविण्याकरीता बेकायदेशीर कृत्ये सातत्याने चालु ठेवल्याचे निष्पन्न होत आहे. या गुन्हयांचे अवलोकन अभ्यास करुन टोळी प्रमुख धिरज भारत पुणेकर, वय ३६ वर्षे, रा. घर नं.७५,संजयनगर,कुमठेनाका, सोलापुर, त्याचे इतर आठ साथीदार यांच्याविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे अशी, माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

अशी करण्यात आली कारवाई -पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द, मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे, समाजामध्ये दहशत निर्माण करणारे, सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले होते. गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील ३७ वी कारवाई आहे. २० सप्टेंबर २०२० ते डिसेंबर २०२० या वर्षात 07 मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 54 आरोपी,जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षभरात 56 कारवाई करण्यात आल्या होत्या. जानेवारी २०२२ ते ०७ ऑक्टोबर २०२२ या काळात 37 कारवाई करून 216 आरोपी विरुद्ध 10 मोक्का अंर्तगत कारवाई करण्यात आली आहे. तसेच या कारवाईमध्ये पुणे शहरातील कुख्यात टोळी मधील बंडु आंदेकर, महादेव अदलिंगे,निलेश घयवाळ,सचिन पोटे,बापु नायर, सुरज ठोंबरे, अक्रम पठाण यागुन्हेगांराचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details