पुणे - पुणेकरांना दिलासादायक बातमी आहे. पुण्यात आढळून आलेल्या पहिल्या ओमायक्रॉनरुग्णाचे रिपोर्ट हा निगेटिव्ह ( Pune First Omicron Patient Negative ) आला आहे. पुढील काही 7 दिवस त्या रुग्णाला निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय वावरे यांनी दिली. तर पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे 6 रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह सापडले होते त्यातील 4 रुग्ण हे देखील निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
29 तारखेला पुण्यात सापडला होता पहिला रुग्ण -
पुणे शहरातील 47 वर्षीय पुरुषाला 29 नोव्हेंबरला कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला होता. पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळले होता. हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर या काळात फिनलंड येथे गेला होता. 29 तारखेला थोडासा त्रास झाला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविडबाधित आढळला होता. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आता 10 दिवसानंतर त्या रुग्णाची टेस्ट केली असता ती टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आणि पुढील 7 दिवस त्या रुग्णाला निरीक्षणात ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येईल.