पुणे - पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आले असता, माजी मुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या सातारा उमेदवारी बद्दल मत व्यक्त केले आहे.
उदयनराजेंच्या विरोधात पोटनिवडणुकीत उमेदवारीची केवळ अफवाच - पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंच्या विरोधात निवडणुक लढवणार ही केवळ अफवा - चव्हाण
उदयनराजेंच्या विरोधात पोटनिवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, ही केवळ अफवा असल्याची माहिती स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
हेही वाचा... खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे कॉलर उडवून स्वागत
मी केवळ कराड मधून उमेदवार असेल - चव्हाण
मी केवळ कराडचा विधानसभेचा उमेदवार असून मात्र पक्षाने तिकीट द्यायला हवे, असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित श्रोत्यांमध्ये हशा पिकला.
हेही वाचा... शिवसेना प्रवेशानंतर प्रदीप शर्मा यांचे विरारमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन
साताऱ्यातील पक्षांतर हा लोकशाहीचा खून -पृथ्वीराज चव्हाण
उदयनराजे भाजपात गेल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती अनपेक्षित आहे., हा लोकशाहीचा खून आहे. चार महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली होती. जनतेने त्यांना निवडून दिले. तेव्हा त्यांनी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून अर्ज केला. हे सर्व झाले असताना सद्याची परिस्थिती निर्माण होणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असे चव्हाण म्हणाले.
हेही वाचा... ...म्हणून बारामतीतील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली - रोहित पवार