पुणे - शहराजवळील पिंपरी-चिंचवड येथील निगडी पोलिसांनी परिसरात कुप्रसिद्ध असणाऱ्या रावण टोळीतील सहा आरोपींना अटक केली आहे. रविवारी याच टोळीतील सहा जणांनी कोयत्याचा आणि बनावट पिस्तूलाचा धाक दाखवून एकाला लुटले होते, तर चार वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली होती.
पुण्यातील कुप्रसिद्ध रावण टोळीतील सहा जणांना निगडी पोलिसांनी केले अटक
पुणे शहराजवळील निगडी येथे, सराईतपणे गुन्हे करणाऱ्या कुप्रसिद्ध रावण टोळीतील सहा आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना रविवारीच ताब्यात घेतले होते. यातील एक अल्पवयीन आरोपी फरार होता, त्याचा शोध निगडी पोलीस घेत होते. सहा दिवसानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अविनाश दिलीप शेलार (१९) स्वप्नील उर्फ बबलू शिवाजी वाघमारे (२२) नरेश शंकर चव्हाण (१९) सूर्यकांत सुनील फुले (१९) किरण शिवाजी खवळे (२०) व अन्य एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण कुप्रसिद्ध रावण टोळीचे सदस्य आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण टोळीचा विरोधक सोन्या काळभोर याच्या घरासमोरील वाहनांना दुचाकी वरून आलेल्या सहा जणांनी लक्ष्य करत कोयत्याने तोडफोड केली होती. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. त्यानंतर आरोपींनी ट्रान्सपोर्ट नगर येथे एका चालकाला लुटले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी त्याच रात्री दीड तासात पाच आरोपींना ताब्यात घेतले होते.