पुणे - राज्याच्या राजकारणात मेगाभरतीतून नवनवीन भूकंप होत आहेत, यातच सर्वात मोठा भूकंप उदयनराजे यांच्या रूपाने होईल, असे दिसत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांसोबत बोलताना उदयनराजे हे भाजपमध्ये येतील असा आशावाद व्यक्त केला आहे.
हेही वाचा... उदयनराजे राष्ट्रवादीतच, भाजपकडून पक्षांतराच्या अफवा पसरवल्या - धनंजय मुंडे
उदयनराजे हे दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करतील - चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीत कायम राहणार असल्याची चर्चा सुरु झाली. माञ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाला पुन्हा फोडणी दिली आहे. उदयनराजे हे भाजपात येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय. दिल्लीत जाऊन अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी उदयनराजे भोसले यांच्या भोवती संशयाचे वातावरण निर्माण केले आहे.
हेही वाचा... राज ठाकरे 'ईडी'च्या चौकशीनंतर गप्प झालेत - अजित पवार
उदयनराजे कार्यकर्त्यांशी बोलतील आणि ते भाजपात नक्कीच प्रवेश करतील - पाटील
चंद्रकांत पाटल यांनी यावेळी बोलताना, उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री संपर्कात आहेत. दोघांचे नियमित संवाद सुरु आहे. मंगळवारी दोघात दीड तास संवाद झाला असून उदयनराजेंना कार्यकर्त्यांशी अजून चर्चा करायची आहे. त्यानंतर ते पक्ष प्रवेश आणि राजीनाम्यावर निर्णय घेतील, असे म्हटले आहे.