महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरजवळ अपघात - Anand Shinde

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर जवळच्या वरकुटे इथे पहाटे तीनच्या सुमारास प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे

By

Published : Aug 27, 2019, 9:54 AM IST

Updated : Aug 27, 2019, 11:01 AM IST

पुणे - प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीचा पुणे-सोलापूर रस्त्यावर इंदापूरजवळ अपघात झाला आहे. यावेळी गाडीत एकूण तीनजण असल्याची माहीती मिळाली आहे. या अपघातातून आनंद शिंदे हे थोडक्यात बचावले आहेत.

आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरजवळ अपघात, अपघातानंतर जवळच्या रूग्णालयात घेतले उपचार

सोलापूरच्या दिशेने जात असताना शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात आनंद शिंदे हे थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या पायाला थोडीफार दुखापत झाली आहे. मात्र, या अपघातात त्यांच्या गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.

आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात
अपघातात गाडीचे मोठे नुकसान

सोलापुरातील भाविकांच्या कारला कर्नाटकात अपघात, ५ जागीच ठार

Last Updated : Aug 27, 2019, 11:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details