पुणे -शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली आहे. तब्बल 24 तास चाललेली ही विसर्जन मिरवणूक गेल्या वर्षी पेक्षा 2 तास कमी वेळात पूर्ण झाली आहे. या मिरवणुकीतला शेवटचा गणपती शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता अलका चौकातून विसर्जन मिरवणूक घाटाकडे रवाना झाला होता.
मानाच्या पाच गणपती बरोबरच पुणेकरांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ आणि भाऊ रंगारी या गणपतींचे एक विशेष आकर्षण असते. रात्री अडीच वाजता दगडूशेठ गणपतीची मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर सकाळी सात वाजता ही मिरवणूक अलका चौकात दाखल झाली. पांचाळेश्वर घाटावर सात वाजून 40 मिनिटांनी गणपती बाप्पाचे विसर्जन पार पडले.
हेही वाचा... गणेश विसर्जन : तब्बल २२ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा अरबी समुद्रात विसावला
भाऊ रंगारी गणपती पहाटे साडे पाच वाजता अलका चौकात दाखल झाला होता. त्यानंतर साधारण सात वाजता या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
पुण्यातील मानाच्या गणपतीच्या विसर्जनाची वेळ
- कसबा गणपती - 4.30 वाजता
- तांबडी जोगेश्वरी - 4.50 वाजता
- गुरुजी तालीम - 5.50 वाजता
- तुळशीबाग गणपती - 6.05 वाजता
- केसरीवाडा गणपती - 6.30 वाजता