पुणे -चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरु का बडा महत्व होता है, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले ( Governor Koshyari Controversial Statement ) होते. त्याविरोधात महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यात आता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महापालिकेत आंदोलन करण्यात ( Ncp Protest Against Governor Koshyari ) आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, अशा पद्धतीचे राज्यपाल महाराष्ट्राला मिळणे हे राज्याचे दुर्दैव आहे. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. हे निषेधार्थ आहे. राज्यपालांनी पुण्यात येण्यापुर्वी या जनतेची माफी मागावी, अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारही जगताप यांनी दिला आहे.