महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune NCP Agitation : एमपीएससी आयोगाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन - Pune NCP Agitation

Pune NCP Agitation : पुण्यातील शास्त्री रोडवरील अहिल्यादेवी शिक्षण मंडळ ( Ahilya Devi Education Board ) येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केलं असल, तरी पोलीसांचा मोठा बंदोबस्त ( Police arrangement ) ठेवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एमपीएससी आयोगाच्या ( MPSC Commission ) निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

By

Published : Jul 25, 2022, 1:03 PM IST

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( Maharashtra Public Service Commission ) ( एमपीएससी ) धमकीवजा सूचनेच्या ट्विट ने एमपीएससी आंदोलक विद्यार्थी ( Protesting students ) हे बॅकफूटवर आले आहेत. या विद्यार्थ्यांनी कारवाईच्या भीतीने आज होणारे आंदोलन स्थगित केले आहे. पुण्यातील शास्त्री रोडवरील अहिल्यादेवी शिक्षण मंडळ ( Ahilya Devi Education Board ) येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केलं असल, तरी पोलीसांचा मोठा बंदोबस्त ( Police arrangement ) ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी हे आंदोलन स्थगित केलं असल, तरी याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एमपीएससी आयोगाच्या ( MPSC Commission ) निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या बाबी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई करण्यात येईल, असे ट्विट आयोगाने केले आहे. हे ट्विट तसेच राज्यातील सरकार ( State Govt ) हे तालिबानी सरकार असून सरकार विरोधात बोलायचं नाही. सरकार विरोधात आंदोलन करायचे नाही, अशी भूमिका हे सरकार मांडत आहे. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आंदोलन करत आहे, अशी माहिती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील नव्या बदलासंबंधी विद्यार्थ्यांचे काही आक्षेप होते. वर्णनात्मक परीक्षापद्धतीचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले होते. मात्र, त्यासाठीचा अभ्यासक्रम हा अवाढव्य असून, त्याच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी द्यावा. २०२३ ऐवजी २०२५ पासून अभ्यासक्रम राबवावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली होती. त्यासाठी विद्यार्थी हे आंदोलन करणार होते. परंतु, आयोगाच्या ट्विट ने विद्यार्थ्यांनी आज होणारा आंदोलन स्थगित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details